Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

 

सोलापूर : हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात अनोळखी तिघांनी बीअरची बॉटल फाेडून तरूणाला जखमी केले. यात कुणाल सुर्यकांत कसबे ( वय ३८, रा. मीरनगर, जुळे सोलापूर) हा तरूण जखमी झाला आहे. याबाबत विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कसबे हा हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन एका टेबलवर बसला होता. तेव्हा तीन अनोळखी तरूण तेथे येऊन दुसरीकडे बस, असे म्हणाले. कसबे आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर डोक्यात बिअरची बाटली फोडून कसबेला जखमी केले. कसबेच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक शेळके करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *