Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

सोलापूर  विहिरीचे खोदकाम करत असताना ५० ते ५५ फुटावरून मोठा दगड डोक्यात पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी शिवारात घडली. सुभाष सोमलिंग राठोड ( वय ४१, रा. जेऊर गोपाळ तांडा, ता अक्कलकोट ) असे त्या मयत मजुराचे नाव आहे.

मृत सुभाष राठोड शनिवारी सकाळी जेऊर शिवारातील गौराबाई सुतार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी ५० ते ५५ फुटावरून विहिरीवरील मोठा दगड त्यांच्या डोक्यावर पडला. त्यामुळे दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात रविवारी सकाळी दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *