Breaking |माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक
100 कोटी वसुलीच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
तब्बल13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनेही मोठी कारवाई केली. सोमवारी सकाळपासून माजी गृहमंत्री देशमुख यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर देशमुखांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे .सेक्शन पी एम एल ए अंतर्गत कारवाई केली आहे.
अनिल देशमुख स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यांना कोणताच पर्याय उरला नसल्यामुळे त्यांना हजर व्हावे लागले अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत देशमुख यांनी दिली.
अनिल देशमुख काहीतरी लपवत असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अनेक प्रयत्नानंतरही त्यांनी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली त्यामुळे ईडीने अटक केली.
पोलीस बदल्यांमध्ये पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.
अनिल देशमुख यांनी ईडीला सहकार्य केलं नाही असं ईडीचे म्हणणं आहे
आज सकाळी दहा वाजता त्यांची मेडिकल टेस्ट केली जाईल आणि त्यानंतर अकरा वाजता त्यांना कोर्टात हजर केले जाईल अशी माहिती समोर आली आहे.
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी हे सरकार आहे की नोटा छापण्याची मशीन असा आरोप आज सकाळी केला आहे. एका महिन्याला शंभर कोटी वसुली केली जात होती. असे त्यांचे म्हणणे आहे.
Leave a Reply