सोलापूर
सोलापूर- 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कु.ऐश्वर्या प्रधाने यांच्या अवकाश फाऊंडेशनचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सोलापूरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.शशिकांत उबंरदंड, डॉ.मोनिका उबंरदंड, दमाणी प्रशालेचे शिक्षक श्रीराम फुलारी, सामाजिक कार्यकर्त्या सौ.निता गवळी, नारायणी स्पोर्ट्स ॲकॅडमचे शितलकुमार शिंदे, शिवशक्ती नवरात्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बिज्जु प्रधाने, अवकाश उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणारे सहकारी, प्रधाने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या शुभहस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच दिप प्रज्वलित करुन करण्यात आले.
समाजप्रबोधनात्मक संदेश देण्यासाठीची ऐश्वर्या प्रधाने यांची संकल्पना अवकाश मधील चित्रकला विभागाचे शिक्षक श्री.इंद्रजित चव्हाण यांनी रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली. यावेळी अवकाश मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हाताचे ठसे उमटवून आपल्या अवकाश संस्थेच्या पुढील वाटचालीस अनोख्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत ऐश्वर्या प्रधाने यांनी अवकाश या संस्थेबद्दलची माहिती, संकल्पना, संस्थेचे पुढील ध्येय धोरणे आणि उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी मान्यवरांनी ऐश्वर्या प्रधाने यांच्या या नावीन्यपूर्ण कार्याचे कौतुक करित पुढील कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिला. तसेच संस्थेच्या यापुढील सर्व उपक्रमात कायम सोबत राहून मदत करण्याची ग्वाही प्रमुख मान्यवरांनी दिली. यावेळी सुत्रसंचालन आशिष प्रधाने यांनी केले व आभार हर्षल प्रधाने यांनी मानले.