Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

MH13 News Network

 

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जनता सहकारी बँकेने कोविडच्या खडतर काळानंतर बँकिंग क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. २०२२ – २३ या गेल्या आर्थिक वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेस लेखापरिक्षणपूर्व (unaudited) तब्बल २४ कोटी ५० लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जनता सहकारी बँकेकडे १८११ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ९७४ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय २७८५ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल ७०.८९ कोटी रुपये आहे. तर बँकेची निव्वळ संपत्ती १३७ कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) १२ टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यातदेखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता १६.९७ टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले.

यंदा सोलापूर जनता सहकारी बँकेने ४३.५७ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा मिळवला आहे. तर बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए ४.२८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. नवीन वाहन खरेदी व गृहकर्जदेखील ८.३० टक्क्यांपासून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून अनोखी भेट मिळाली आहे.

कोविड महामारीच्या काळात एकूणच बँकिंग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला होता. यातून मार्ग काढत सोलापूर जनता सहकारी बँकेने यंदा २४.५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे, असेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले.

या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, संचालक वरदराज बंग, प्राचार्य गजानन धरणे, तज्ञ संचालक ॲड. प्रदीपसिंह राजपूत, सी. ए. गिरीष बोरगावकर, मुकुंद कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, पुरूषोत्तम उडता, विनोद कुचेरिया, जगदीश भुतडा, आनंद कुलकर्णी, राजेश पवार, बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉ. अजित देशपांडे, पेंटप्पा गड्डम, सी ए. राजेंद्र बुरा, मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
———–

यंदा सभासदांना लाभांश देण्याचा मानस

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सभासदांना लाभांश देण्याबाबत बँकेचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया सोबत पत्रव्यवहार करण्यात येणार असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असे सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *