भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

Big9 News

सोलापूर, दि.14,एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  केले.

   

यावेळी महानगरपालिका आयुक्त शीतल तेली – उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले, विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच, प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना जातींचे दाखल्यांचे वाटप करण्यातआले. यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.