राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भिमशक्ती सेना तरूण मंडळाकडून मिलिंद नगर बुद्धविहार लगत बाग फुलवण्याचा ध्यास धरित तरुणांनी वृक्षारोपण करुन सदर झाडे लावुन ती जगवण्याची शर्यत सुरुवात केली,आज क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीनिमित्त अनेक झाडे लावली गेली.यावेळी लावल्या गेलेल्या झाडांना मंडळातील सभासदांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका लहान मुलाचे नाव देऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,सदर वृक्षारोपणाचे चीज करण्यासाठी युवा पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आतिश बनसोडे यांनी बालकांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रत्येकी झाडास थोरला राजवाडा पहिली कमानी येथील भिमशक्ती सेना तरुण मंडळातील लहान मुलांची नावे सदर वृक्षास देऊन सदर झाड जतन करणार्यास लहान मुलास आकर्षक बक्षिसांची पर्वणी जाहीर केली.
उपक्रमांतर्गत विविध झाडे लावणाऱ्या बालकांची आणि झाडांची नावे…
जास्वंद- प्रियदर्शनी ढावरे,
अशोका- पृथ्वीराज सोनवणे,
पांढरी जास्वंद- आर्यन भोरे,
सीताफळ- निखिल सोनवणे,
सप्तपर्णी- श्रवण कांबळे,
करंजा- प्रेम ढावरे,
कर्दळी-वीर तळभंडारे,
बदाम-चिंटु माने,
अशोका- प्रिन्स भालेराव,
करंजा-सौम्य निकंबे,
उपक्रम राबविण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष नितीन कदम,सचिव अमर साळवे, विशाल(भिमा)कांबळे,रोहन आखाडे,रॅम्बो साळवे,विश्व सोनवणे,प्रशिक माने,आकाश थोरे,तुषार कांबळे,आदिनी उपक्रम राबविण्यात अथक परिश्रम घेतले.
Leave a Reply