Breaking |आता…बिबट्या माढ्यात ?? ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील बिबट्याचा खात्मा करून काही दिवसच होत नाहीत तोपर्यंत माढा तालुक्यातील उंदरगाव येथील शेतकऱ्याला बिबट्या दिसल्याचे बातमी माढा परिसरात पसरली आहे. त्यामुळे उंदरगाव सह माढा भागात भितीचे वातावरण पसरले आहे. करमाळा येथील बिबट्यांची भीती अजून कायम असतानाच आज सायंकाळी सहाच्या सुमारास उंदरगाव शिवारात बिबट्या दिसल्याचे स्थानिकाकडून सांगितले जात आहे. या घटनेची माहिती दादासाहेब साठे यांनी वन विभागास दिली आहे. सीना काठचा परिसर ऊस पट्टा असल्याने या भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की उंदरगाव ते उपळाई खुर्द रस्त्यावर पारडे वस्तीच्या परिसरात आज सायंकाळी सहाच्या सुमारास बंडू पारडे या युवकास बिबट्या दिसला असल्याचे सांगितले जाते आहे बिबट्या दिसल्यानंतर त्याने घाबरलेल्या अवस्थेत दादासाहेब साठे यांना फोन करून माहीत दिली. या घटनेमुळे उंदरगाव आणि आसपासच्या परिसरात घबराटीचे वातावरणात निर्माण झाले आहे
या महिन्याच्या सुरूवातीपासून माढा तालुक्याच्या लगत असलेल्या करमाळा तालुक्यात बिबट्याने तीन जणाचे बळी घेतल्याने जरी तेथे बिबट्याला ठार मारले असले तरी अजूनही तेथील बिबट्याची दहशत कमी झालेली नसतानाच आता माढा तालुक्याच्या सीना काठच्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या वृत्ताने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे
उद्या वनविभागाचे अधिकारी त्या स्थळी येणार…

दरम्यान या संदर्भात माढ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती समजली असल्याचे सांगत या संदर्भात मोहोळ वनविभागाशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. उद्या वन विभागाचे अधिकारी येऊन ‘त्या’परिसराची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली