Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH13NEWS Network

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी
सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंद्यांचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत  पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विषेश पथकाची नेमणूक केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडील पथकाने मागील काही दिवसापूर्वी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यावर हल्ला करणा-या वाळू माफियातील मोका अंतर्गत फरारी असलेल्या मिरी ता. मोहोळ येथील 02 दरोडेखोरांना जेरबंद करून कारवाई केली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे नंदूर ता. उत्तर सोलापूर शिवारातील नंदूरकर यांचे शेतालगत असलेल्या सिना नदीच्या पात्रातून काही इसम यारी मशिनच्या सहायाने शासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी विषेश पथकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश दिले. सहा. पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांनी पथकासह नंदूर (ता. उत्तर सोलापूर) शिवारातील नंदूरकर यांचे शेताजवळ आले असता तेथे काही इसम शेतालगत असलेल्या सिना नदीच्या पात्रातून काही ट्रॅक्टरला यारी मशीन जोडून त्याव्दारे वाळू काढून त्याचा साठा करून उभेअसलेल्या टेम्पो ट्रकमध्ये वाळू भरत असताना मिळून आले. सदर ठिकाणाहून एकूण 17 आरोपीना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून एकूण 10 ब्रास वाळू, 01 यारी मषिन, 1 ट्रॅक्टर, 3 टेम्पो ट्रक, 1 सुमो, 2 मोटार सायकली इ.सह एकूण 16 लाख 20 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.


सदर बाबत पो.हे.काॅ/ मोहन शामकर्ण मनसावाले यांनी फिर्याद दिल्याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुरंन 102/2021 भादविकाक 379, 34 पर्यावरण कायदा 1986 चे कलम 9 व 15 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी साततपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक यांचे पथकातील सहा.पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस हवालदार/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार/ धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *