महेश हणमे /9890440480
सोलापूर हैदराबाद रोडवर मार्केट यार्ड पोलीस चौकी शेजारी असलेल्या एका गॅरेजमध्ये काम करत असलेल्या एका मेकॅनिकचा भरधाव वेगाने जाणाऱ्या ईनोवा गाडीने बळी घेतला.ही दुर्दैवी घटना आज रविवारी साधारण सव्वाचारच्या सुमारास घडली. मृत्यूचा सापळा बनलेल्या या चौकात नेहमीच अपघात होत असल्याने ही मालिका कधी खंडित होणार याकडे सोलापूरकर यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सोलापुरातील मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाशेजारी कृष्णा मोटार गॅरेज आहे. याठिकाणी काम करत असणारे देविदास बाळासाहेब दासरी (वय वर्ष- 51) राहणार वज्रेश्वरी नगर अक्कलकोट रोड सोलापूर, आणि त्यांच्यासोबत गाडी दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीस भरधाव जाणाऱ्या ईनोवा गाडीने जोराची धडक दिली.
त्यात देविदास दासरी यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
दरम्यान ,त्यांच्या सोबत असलेल्या निलेश तेली वय वर्षे 21 राहणार परेल, मुंबई यास गंभीर दुखापत झालेली आहे.त्यास . सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नजरेसमोर हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
जेल रोड पोलिस स्टेशन मध्ये सदर गुन्ह्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.
अपघातात गंभीर जखमी असणारा निलेश तेली याचे ही आज रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.