Breaking | मी जबाबदार !! लॉकडाऊन साठी आठ दिवसाचे अल्टिमेटम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मास्क घाला लॉकडाऊन टाळा ,
गर्दी करणाऱ्या आंदोलनांना काही दिवस बंदी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे आणि जर लॉकडाऊन नको असेल तर मास्क पाळा, ऑफिसच्या वेळा यांची विभागणी करा, वर्क फ्रॉम होम वर भर द्या असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ संदेश च्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे.
सर्वांनी कोरोनाचे नियम पाळणे जरुरीचे आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांकडून आज मी जबाबदार या मोहिमेची घोषणा करण्यात आली. आज रविवारी फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ संदेश द्वारे जनतेला आवाहन केले आहे.

लॉकडाऊन करायचा का ? हा थेट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला विचारला. याचे उत्तर मी प्रत्यक्ष भेटून नाही विचारणार परंतु या आठ दिवसात मास्क वापरणारे ,स्वच्छ हात धुणारे, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणारे यांचा एक वर्ग असेल तर त्यांना लॉकडाऊन नको आहे असे समजले जाईल ,मात्र जे विना मास्क फिरतील, त्यांना लॉकडाऊन हवा आहे असा याचा अर्थ होईल यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे .आपला मास्क हीच आपली ढाल असल्याचे त्यांनी सांगून राज्यातील जनतेला कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.