Big9news Network
सोलापूर माध्यम क्षेत्रातील नावाजलेला चेहरा पत्रकार खलील शहानुरकर यांचे आज गुरुवारी सायंकाळी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 39 होते, त्यांच्या पश्चात मोठा भाऊ, पत्नी व एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
खलील हे दमाणी नगर भागात रहात होते. आज दुपारी अचानक त्रास होऊ लागल्याने दमानी नगर भागातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलकडे हलविण्याचा सूचना केल्या.
दरम्यान, मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुःखद घटनेने माध्यम क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
खलील हे उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून त्यांची सोलापुरात एक वेगळी ओळख होती. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘दिनमान’ या चैनल मधून झाली त्यानंतर ‘मी मराठी’ या प्रादेशिक वाहिनी साठी त्यांनी कॅमेरामन म्हणून काम केले. पुढे सोलापूर शहरातील इतर स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये काम केल्यानंतर सध्या ते बी आर न्यूज चॅनल मध्ये मागील अनेक वर्षापासून कार्यरत होते. अतिशय मनमिळावू असं त्याचे व्यक्तिमत्त्व होतं.