Latest Post

10+ Best Crypto As Well As Bitcoin Craps Casinos June 2024 Top 10 Mobile Casinos Real Money Game Titles In 202

माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना दुष्कर्म केल्याप्रकरणी अटक न करण्याचे आदेश
सोलापूर दि:- एका महिलेवर केलेल्या कथित दुष्कर्म प्रकरणी आपणास अटक होईल या भीतीने माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर होऊन त्यांनी श्रीकांत यांस अटक न करण्याचे आदेश पारित केले.
यात हकीकत अशी की, मुंबई येथील एका महिलेने अर्जदार श्रीकांत देशमुख यांनी त्यांना लग्नाचे अमिष दाखवून मुंबई,सोलापूर,पुणे,सांगली इत्यादी ठिकाणी त्यांच्यावर दुष्कर्म केले,मात्र लग्न केले नाही अशा आशयाची फिर्याद प्रथमता पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र पोलिसांनी ती सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग केली व पोलीस श्रीकांत देशमुख यांना अटक करणेसाठी त्यांचे मागावर होते.त्यामुळे आपणास त्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा अर्ज एडवोकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत दाखल केला. सुनावणीचे वेळी एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात सक्रत दर्शनी दुष्कर्माचा गुन्हा आकर्षित होत नाही.अर्जदार हा कोठेही पळून जाणार नाही व तो न्यायालयाचे आदेशाचे पालन करेल असा युक्तिवाद केला,त्यावरून न्यायाधिशांनी श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश पारित केला . मात्र पोलीस ठाण्यात दिनांक 26 /7/ 2022 व 27/7/ 2022 रोजी हजेरी देण्याचा आदेश केला व पुढील सुनावणीसाठी दिनांक 28/7/2022 ही तारीख नेमली.
यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे एडवोकेट आकाश गायकवाड मुंबई एडवोकेट बाबासाहेब जाधव ऍडव्होकेट विनोद सूर्यवंशी ऍडव्होकेट निशांत लोंढे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *