Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH 13 News Network

छ्त्रपतींच्या जयघोषाने जिल्हा परिषद दणाणली…!

सोलापूर – भगवे फेटे…शाहिरा्चा पोवाडा….! अंगावर शहारे आणणारे शिवरायांच्या गितांनी यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले. छ्त्रपतींच्या जयघोषाने जिल्हा परिषद दणाणली…! ..छत्रपती शिवरायांचे विचारांचा जल्लोष करीत मराठा सेवा संघ शाखेतर्फ कार्यकुशल पुरस्कार देऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

जिल्हापरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आल्या नतंर जिल्हा परिषदेचे आवारातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे पुतळ्यास सिईओ कोहिनकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला..

त्यानंतर जिल्हा परिषदेमधील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस सिईओ संदीप कोहिनकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या मराठा सेवा संघ शाखा व माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे होते. प्रारंभी मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांचे हस्ते सिईओ संदिप कोहिनकर यांचे शाल व फेटा बांधून स्वागत करण्यात आले.

त्यानंतर मराठा सेवा संघ शाखेचे वतीने देण्यात येणारा कार्यकुशल पुरस्कार मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, गट विकास अधिकारी मनोज राऊत, वैदयकिय अधिकारी डॉ.सागर मंगेडकर, शाखा अभियंता श्री राजेश जगताप,ग्रामविकास अधिकारी श्री पांडुरंग कागदे,ग्रामसेवक श्री नागनाथ जोडमोटे,प्राथमिक शिक्षक अर्जुन आवताडे,वरिष्ठ सहाय्यक श्री प्रदीप सकट ,वरिष्ठ सहाय्यक (लेखा) विलास मसलकर,परिचर श्री विरभद्र हिरजे यांना प्रदान करणेत आला. यावेळी जेष्ठ पत्रकार यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक सुलभा वठारे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी,, कार्यकारण अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, अधिक्षक अनिल जगताप, लिपिक वर्गीस संघटनेचे संघटक राजेश देशपांडे, जि प कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, गिरीष जाधव, अधिक्षक चंद्रकांत होळकर, अधिक्षक सचिन सोनकांबळे, अध्यक्ष,संतोष जाधव,आप्पाराव गायकवाड, प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोटीवाले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी सचिन चव्हाण,राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळूंखे, प्रकाश शेंडगे,सुभाष कदम, आप्पासाहेब भोसले, विष्ठल मलपे,संतोष शिंदे, संजय पाटील ,अजित देशमुख, महेश पाटील, विशाल घोगरे, चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, गणेश साळूंखे, सचिन पवार, उमेश खंडागळे, जयंत पाटील, महेंद्र माने,अभिजीत निचळ, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, विनायक कदम, सुनिता भुसारे, आश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, सविता मिसाळ उपस्थित होत.
सदर प्रसंगी सचिन चव्हाण,राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळूंखे, प्रकाश शेंडगे,सुभाष कदम, आप्पासाहेब भोसले, विष्ठल मलपे,संतोष शिंदे, संजय पाटील ,अजित देशमुख, महेश पाटील, विशाल घोगरे, चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, गणेश साळूंखे, सचिन पवार, उमेश खंडागळे, जयंत पाटील, महेंद्र माने,अभिजीत निचळ, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, विनायक कदम, सुनिता भुसारे, आश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, सविता मिसाळ यांनी परिश्रम घेतले.

शिवरायांचे उपक्रम शासन राबविते – सिईओ कोहिणकर 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पिण्याच्या पाण्याचे सुरक्षित तलाव बांधले. जलसंधारणाची कामे छत्रपती शिवरायांचे काळात राबविली गेली. हीच कामे शासन राबवित आहे. छत्रपतींनी वृक्षसंवर्धना पासून ते जलसंवर्धनपर्यंत लोकहिताची कामे केली. शिवराय हे रयतेचे मनांत होते. म्हणून ते सुराज्य घडवू शकले असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर यांनी व्यक्त केले.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *