Big9 News
चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
खासदार राहुल शेवाळे यांच्या स्थानिक विकास निधीतून या अशोक स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. या लोकार्पणप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.