Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. संखे यांच्यासह यशस्वी उमेदवारांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’सारथी’ संस्थेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही लक्षणीय आणि घवघवीत यश मिळवले आहे, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्वच यशंवत, गुणवंतांचे मनापासून अभिनंदन. या सर्वांच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचीही साथ महत्त्वाची ठरते. म्हणूनच या यशस्वी उमेदवारांसह, त्यांच्या कुटुंबियांचेही अभिनंदन. या सर्व यशस्वींकडून प्रशासकीय सेवेच्या आपल्या माध्यमातून समाजाची,पर्यायाने राज्य आणि देशाची सेवा घडेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *