Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big 9 News Network

सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाकडून पुन्हा प्रतिबंधीत क्षेत्राची कडक अंमलबजावणी
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागात जास्त रुग्णसंख्या असलेल्या भागात कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या पासून कन्टेन्मेंट झोन तयार केले जाणार असून प्रतिबंधीत क्षेत्रात दळणवळण पुर्णपणे बंद राहणार आहे. फक्त आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून प्रतिबंधीत क्षेत्रात कडक पोलिस बंदोबस्त राहणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील खालील तालुक्यात जास्त रूग्ण संख्या असलेल्या गावात प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
मंगळवेढा : दामाजी नगर, चोखामेळा नगर
अक्कलकोट : समर्थ नगर
सांगोला : कडलास
बार्शी : गौडगाव, भालगाव
पंढरपूर : टाकळी,देगाव,सुस्ते
दक्षिण सोलापूर : मुस्ती
करमाळा : विट, देवळाली, वांगी, जेऊर
माळशिरस : २ एरीया अकलूज
उत्तर सोलापूर : कौठाळी
मोहोळ : पोखरापूर
माढा : २ झोन टेंभुर्णी
वरील भाग प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केले असून नागरिकांनी याभागात जाणे टाळावे तसेच प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांनी प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर संचार करु नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *