शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी:
सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर होत असताना दिसत आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोरोनाचा प्रकोप टाळावा असे आवाहन वारंवार प्रशासनाकडुन केले जात आहे.
आज माढा तालुक्यात 70 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे . तर रुग्णालयातून बरे होऊन 13 जण घरी परतले आहे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.शिवाजी थोरात यांनी सांगितले. त्याच बरोबर नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे व धोका टाळावा त्याचबरोबर नियमांचे पालन करावे व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
बाधित व्यक्ती या परिसरातील…
आज दिनांक 01/4/2021 वार गुरुवार या गावातील रूग्ण वाढ झाली आहे – माढा 1, कुर्डुवाडी 4, टेंभुर्णी 13, बारलोणी 3, विठ्ठलवाडी 1, चिंचोली 2, भोसरे 1, रोपळे क 1, तांदुळवाडी 1, चिंचगाव 1,उपळाई बु 1, वडशिंगे 1, बैरागवाडी 1, लऊळ 1,तुळशी 1,अरण 3, परितेवाडी 2, भेंड 2, बावी1, परिते 1, वरवडे 2,भोईजे 1, निमगाव टे 1, पिंपळनेर 1, अकोले बु 5, सापटणे टे 1, शिराळ टे1, कन्हेरगाव 2,चांदज 4, रणदिवेवाडी 1, तडवळे 1,वडाचेवाडी तम 1, कुर्डु 2,धानोरे 4, माढा तालुक्यातील या गावात आज रूग्ण वाढ झाली आहे. नियमांचे पालन करा आणि कोरोनाला हद्दपार करा व सुरक्षित रहा.