दि.13 : भारतात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) वाढतचं चालला आहे. देशातील पाच राज्यात जास्त रुग्ण संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त रुग्ण संख्या वाढत आहे.
रुग्णांची वाढती संख्या देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवाय कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (Corona Virus new Strain) आणखीच धोकादायक बनत चालला आहे, असा खुलासा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन गुप्त बनत चालला आहे. एखाद्या रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतरही हा विषाणू आरटी- पीसीआर चाचणीत सापडत नाही.
कोरोनाची अनेक लक्षणं असूनही दोन-तीन वेळा RT-PCR चाचणी केल्यानंतरही रुग्णांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही? हे शोधणं कठिण बनत चाललं आहे. विशेष म्हणजे RT-PCR ही टेस्ट आतापर्यंत सर्वात चांगली टेस्ट मानली जात होती. पण आता या चाचणीतही कोरोना विषाणू सापडत नसल्याने देशासमोरील चिंता वाढताना दिसत आहेत.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आकाश हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आशिष चौधरी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत आम्हाला असे बरेच रुग्ण सापडले आहेत. ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्याची समस्या आणि फुफ्फुसांचा संसर्ग होता. त्याचबरोबर सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसात हलका तपकिरी रंगाचा पॅच दिसला आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘पॅची ग्राउंड ग्लास ओपॅसिटी’ असं म्हटलं जातं. हे कोविड -19 चं लक्षण आहे.
त्यांनी पुढं असंही सांगितलं की, पीडित रुग्ण ब्रोंकोएलेवोलर लॅवेजने ग्रासित आहेत. ही एक डायग्नोस्टिक तंत्र आहे. ज्यामध्ये रुग्णाच्या नाकातून अथवा फुफुसातून एक द्रव्य घेतला जातो. पुढे डॉ. चौधरीने सांगितलं की, ज्या लोकांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती, त्या सर्वांची लॅवेज चाचणी करण्यात आली. लॅवेज चाचणीत सर्वांना कोरोना विषाणूची बाधा असल्याचं निष्पन्न झालं आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्सेसच्या मेडिकल मायक्रोबायोलॉजीच्या प्रोफेसर डॉ. प्रतिभा काळे यांनी सांगितलं की, “या विषाणूने संबंधित रुग्णांच्या नाक किंवा घशाच्या छिद्राला इजा पोहचवलेली नाही, कारण या औषधांमधून घेतलेल्या स्वॅबच्या नमुन्याचा रिजल्ट पॉझिटिव्ह आला नाही.’ त्यांनी पुढे सांगितलं की, ‘हे शक्य आहे की विषाणूने स्वतःला एसीई रीसेप्टर्सशी स्वतःला जोडून घेतलं आहे. हा एक प्रोटीनचा प्रकार आहे, जो फुफ्फुसांच्या आतमध्ये अनेक प्रकारच्या पेशींच्या रुपात असतो. त्यामुळे येथून नमुने घेतल्यास रुग्णाला कोविड-19 च्या संसर्गाची पुष्टी करण्यात आली आहे.