येत्या पंधरा दिवसात निवडणुका जाहीर करा असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. आज 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिला आहे.
यामुळे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील असे चित्र स्पष्ट झाला आहे. महापालिका झेडपी निवडणूक दोन आठवड्यात जाहीर करा असे कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत.
मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये निवडणूका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणी कडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते.
विशेषता सोलापूरमध्ये अनेक महापालिकेचे कारभारी देव पाण्यात ठेवून बसले होते की नेमका निर्णय काय होतोय.? आजच्या आदेशामुळे बरेचसे चित्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षण शिवाय होतील.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा
- सुप्रीम कोर्टाचे आदेश
- मार्च 2020 च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश, राज्य सरकारला दणका
जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित
या ठिकाणी होणार आहेत निवडणुका
मुंबई, पुणे ,पिंपरी-चिंचवड ठाणे उल्हासनगर
मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर ,चंद्रपूर ,सोलापूर