महेश हणमे/9890440480
कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्या करिता पालिका प्रशासना सोबत आता स्थानिक सामाजिक संस्थेच्या मार्फत कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महापालिका उपआयुक्त धनराज पांडे यांनी दिली ….
सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्याअनुषंगाने शहरात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्या करिता महापालिका आणि जिल्ह्य प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न केले जात आहेत, तरीदेखील देखील करोना आटोक्यात येताना दिसत नाही, करोना सारख्या महामारीवर नियंत्रण मिळविण्या साठी पालिकेला लोकसहभाग अवश्यक आहे म्हणून पालिका प्रशासनाकडून करोना सारख्या महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्या करिता स्थानिक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे ,
सेवाभाव वृत्तीने शहरातील काही सामाजिक संस्था संघटना कोविड केअर सेंटर चालू करून इच्छित असल्यास अशा संघटना संस्थेनी पालिकेशी संपर्क साधून परिसर परवानगी घ्यावी योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वात सह परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशीही माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
एखाद्या संस्थेने कोविड केअर सेंटर चालू करून करोनाच्या प्रादुर्भावावर प्राथमिक उपचार करण्यास परवानगी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जैन सोशल गृप,जमाते उलेमा ,ग्रामीण पोलीस मुख्यालया आणि शहर पोलीस आयुक्तालया कडून कोविड केअर सेंटर उभारण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगीतले.
आता वेळ आली समाजऋण फेडण्याची…
व्यक्तीला आपल्या जातीचा, धर्माचा, समाजाचा अभिमान असतो. समाजात वावरताना तोरण दारी आणि मरणदारी या न्यायाने तो कार्यक्रमात सहभागी होतो.व्यक्तीला सामाजिक जीवन जगताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कोरोना महामारीच्या काळात समाजाला आपल्या समाजातील बांधवांसाठी कार्य करण्याची संधी आली असून हीच वेळ सामाजिक ऋण फेडण्याची आहे. महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व समाजाने पुुढे येणेे गरजेचे आहे.