महेश हणमे /9890440480
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. सद्यस्थितीत वेगाने लसीकरण होत आहे. राज्य सरकारने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार लसीकरण प्रमाणपत्र Covid Certificate
असणे गरजेचे आहे. परंतु लसीकरण प्रमाणपत्र ऑनलाईन Online कसे डाउनलोड करावे याची माहिती अनेकांना नसते त्यामुळे शासनाने ही नवी प्रणाली सुरू केलेले आहे.
व्यापार्यांसाठी, त्यांच्या कामगारांसाठी दुकाने सुरू ठेवण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे.आंतरराज्य प्रवेशासाठी,लोकल प्रवास,याचसोबत अनेक ठिकाणी प्रवास करण्यासाठी लस प्रमाणपत्र आवश्यक असते.
सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत.
सोपी पद्धत…
MyGov कोरोना हेल्पडेस्क वरील नवीन वैशिष्ट्य …
1️⃣ केवळ Covid Certificate असे व्हाट्सॲपमध्ये टाइप करा. 9013151515 या नंबरला पाठवा.
2️⃣आपला ओटीपी (OTP) करा आणि लगेचच आपल्याला आपले COVID19 लसीचे प्रमाणपत्र मिळेल.