लागीर झालं जी मालिकेतील अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू

Big9news Network

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’मध्ये काम करणारे अभिनेते ज्ञानेश माने यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. रोटी घाटातून पुण्याला येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

ज्ञानेश हे मुळचे बारामतीतील झारगडवाडी येथील होते. ते पेशाने डॉक्टर होते पण अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. ज्ञानेश यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे