Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या नियोजनासाठी शहरातील दोन्ही विश्वस्त समितीचे पदाधिकारी. मध्यवती जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी समाजातील राजकीय, सामाजिक, कामगार आघाडी, विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी, धार्मिक संघटनाचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकारी आणि चळवळीतील कार्यकत्यांची संयुक्त बैठक खालील विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

तरी सोलापूर शहरातील सर्व डॉ. आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सदर बैठकीत उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती.

विषय:- १) सन २०२२ चा जमाखर्च सादर करणे,

२) सन २०२३ चे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी नेमणे,

३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सप्ताह ठरविणे.

४) अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्यावेळेचे विषय शुक्रवार दि. ३१/०३/२०२३ वेळ सायं. ५.३० वा. स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल, फॉरेस्ट सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *