Big9 News
राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त मंडळीच्या अधिपत्याखाली आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी केसरकर यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवसेना जिल्हा अध्यक्ष मनीष निकाळजे, तालुका प्रमुख संजय देशमुख, नगरसेवक महेश हिंडोळे, ऋषिकेश लोणारी, बाळा शिंदे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ – शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना आ. सचिन कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.
Leave a Reply