महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठ्याप्रमाणावर वळण देत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वतःकडे न घेता सेनेतून आलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. आज गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ही सर्वात मोठी घोषणा केली.
गेल्या आठ-दहा दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज पडदा पडला असून मुख्यमंत्रीपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार पुन्हा येणार याची चर्चा सुरू होती. परंतु, त्या सर्व चर्चेंना छेद देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
महाविकास आघाडीचे दोन दोन मंत्री जेलमध्ये जातात ही बाब राज्यासाठी मोठी खेदजनक आणि संताप जनक आहे. महाविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. याबाबत बोलत त्यांनी सत्ता स्थापनेनंतर दुर्बल घटकांना न्याय देणार असून मराठा आरक्षण त्यासोबत ओबीसी राजकीय आरक्षण याकडे लक्ष देणार असल्याचे आवर्जून सांगितले.