Big9 News
चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्याप वीजबिल भरले नाही, अशा ग्राहकांसाठी पुढील दोन्ही दिवस वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
बारामती परिमंडळात उद्या (गुरुवारी) अकृषिक वीज ग्राहकांची थकबाकी एक हजार १४१ कोटींवर आहे. ही थकबाकी कमी करण्यासाठी वीज कर्मचारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ग्राहकांना वीजबिलाचा भरणा सुलभ व्हावे म्हणून ‘महावितरण’ने वीजबिलावर ‘क्यूआर कोड’ छापला आहे. त्याला स्कॅन करून सहजपणे वीजबिल भरता येते.
पैसे खर्चून रांगेत थांबण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना ऑनलाइन शक्य नाही असे ग्राहक आजही महावितरणच्या नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर वीजबिल भरतात. त्यासाठी सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहे. गुरुवारी श्रीराम नवमीची सुट्टी असली तरी, वीजबिल भरणा केंद्रे नियमित वेळेत सुरु राहतील. तसेच घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲप व विविध यूपीआय अॅप उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.
Leave a Reply