Latest Post

10+ Best Crypto As Well As Bitcoin Craps Casinos June 2024 Top 10 Mobile Casinos Real Money Game Titles In 202

MH 13 News Network

आधार मतिमंद संस्थेस सी एस आर अंतर्गत हिसोअ इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या वतीने मदत

सोलापूर: आधार मागासवर्गीय महिला संस्था सोलापूर च्या वतीने आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारी येथे गेल्या 13 वर्षापासून मतिमंद दिव्यांग आणि वृद्धांसाठी संस्था नवीन विडी घरकुल कुंभारी येथे कार्य करीत आहे.

संस्थेस शासनाची कोणतीही अनुदान, मदत मिळत नाही संस्था स्वखर्चाने कार्य करीत आहे. आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारी या विद्यालयास हिसोअ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यासाठी कॉट, गाद्या, फिजिओथेरपी साहित्य, करमणुकीचे साहित्य, धान्य देण्यात येणार आहे याची माहिती संस्थेचे जगदीश कलकेरी आणि हिसोअ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे श्री सागर घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समाजातील दुर्लक्षित मतिमंद दिव्यांग घटकासाठी काम करीत असलेल्या आधार संस्थेची दखल घेऊन हिसोअ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आपल्या सी एस आर फंड अंतर्गत शाळेस मदत केलेली आहे हा कार्यक्रम दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारीच्या पटांगणात आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास हिसोअ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे मॅनेजर जयदीप मोहिते, सुहास कन्हेरकर, शिवकांत चव्हाण, रोहित वाकळे, सागर घाडगे, राहुल शेंडे आणि विवो कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्स उपस्थित राहणार आहेत

यावेळी संस्थेचे अध्यक्षा शुभांगी कलकेरी यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी संस्थेस सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केलं . पत्रकार परिषदेस शुभम कलकेरी, शुभदा कलकेरी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *