Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी समता सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्याचा शुभारंभ रामवाडी येथे सनत नगर मध्ये करण्यात आला.

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहर झोपडपट्टी सेल अध्यक्ष राजू बेळेनवरू यांनी याठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, प्रभाग नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला शहराध्यक्षा सुनिता रोटे, शहर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अजित पात्रे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख यांच्यासह प्रकाश जाधव, बसवराज कोळी, मिलिंद गोरे,प्रमोद भोसले, श्रीमंत चव्हाण, किशोर चव्हाण, नागेश निंबाळकर, दादाराव रोटे, सोमनाथ शिंदे, लहू हावळे अक्षय जाधव तसेच नगरातील मान्यवर आणि मागासवर्गीय समाज बांधव यांचेसह परिसरातील नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारने मागील २ वर्षात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर सर्व मागासवर्गीय घटकांसाठी विविध निर्णय घेतलेल्या उपक्रमांची माहिती देण्याचा हा उपक्रम समता सप्ताह म्हणून आयोजित करण्यात आला असून येथून पुढील सात दिवस शहरातील विविध भागात असे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे प्रास्ताविकपर भाषणात सांगत राजू बेळेनवरू यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगताना म्हटले की,घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून या सप्ताहाचे आयोजन राज्यभर करण्यात आलेले असून आज सोलापूर शहरात शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असल्याचे विशेष कौतुक वाटत असून समोर उपस्थित लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विचार समजावेत हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.
त्यानंतर शहराध्यक्ष भारत जाधव यांनी उपस्थित लोकांना संबोधित करताना म्हटले की गेल्या २ वर्षात कोरोणामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करता आली नसली तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दलित बांधव तसेच इतर जाती जमाती मधील लोकांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तसेच राज्यातील युवक-युवती व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना व इतर समाजोपयोगी निर्णयाची माहिती पुस्तिका रूपातून उपलब्ध करून देण्यात असल्याचे सांगत त्याचे वाचन करण्यात आले.


शेवटी शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अजित पात्रे यांनी उद्यापासून शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या समता सप्ताहाची माहिती रोजच्या रोज जनतेला तसेच पक्षातील पदाधिकारी यांना कळविण्यात येणार असल्याचे सांगत उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला सनत नगर मधील मुकुंद शिवशरण. रवि गायकवाड, विजू वाघमोडे, मयुर गायकवाड संजय मुरमन, अझहर शेख, बक्षु मुकादम, गौरी चनुरे, संदीप वाघमारे, भागप्पा प्रसन्न, इलाई शहापुरे, सिद्धार्थ भडकुंबे, संजय कांबळे, दशरथ चव्हाण, राजू वाघमारे, प्रशांत बेळे नवरू राहुल बेळेनवरू, प्रशांत सलवदे, आकाश गायकवाड, शंकर लोखंडे आदी उपस्थित होते.

महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील  यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी समता सप्ताह उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 संतोष पवार, कार्याध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *