Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

सोलापूर–राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड19 साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स इतर लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई-पास (e-pass) देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन महापालिका आयुक्त पी.शिवशंकर (P. Shivshankar) यांनी केले आहे.

कोरोना काळात महानगरपालिकेकडे घरपोच सेवा देणाऱ्यांसाठी एकूण 773 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये छाननी झालेले अर्ज संख्या एकूण 647 व ई पास दिलेले अर्ज संख्या 358 आहे.आणि अर्ज नामंजूर केलेली संख्या 289 आहे .जे अर्ज नामंजूर झालेले आहेत त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांचे परवाना अथवा अर्ज करत असताना त्या व्यक्तीचा फोटो, आधार कार्ड (Aadhar card) व rt-pcr चाचणी केलेली निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

काहीचे सर्टिफिकेट तर कोणाचे परवाने नसल्याकारणाने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहे.तरी शहरातील हॉटेल, ई-कॉमर्स, यांच्या आस्थापना विभागाच्या संबंधितांनी ऑनलाइन अर्ज करताना त्या व्यक्तीचा फोटो,आधार कार्ड,परवाने व rt-pcr चाचणी केलेली निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. रजिस्टर झाल्यानंतर आपल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर त्यांना ऑनलाइन पास देण्यात येईल.ई-पास करिता कुठेही जाण्याची गरज नाही त्यांनी फक्त महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.

www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर वरच्या बाजूला E-pass application for home delivery या लिंक वर क्लिक करावे.असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *