Big9 News
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन माजी परिवहन उपायुक्त चंद्रकांत खरटमल यांनी केले.
श्रीनिधी स्वयं सहाय्यता विकास संघ सोलापूर,महादेव मित्र मंडळ शास्त्रीनगर सोलापूर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शास्त्रीनगर येथील महादेव मंदिर येथे निःशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन सेवा निवृत्त परिवहन उपायुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई मा चंद्रकांत खरटमल साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना बदलत्या जीवनशैलीत देखील वेळ काढून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे उद्गार काढले. पुढे ते बोलताना म्हणाले की अलीकडे हृदयविकार,मधुमेह इ.रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दिसून येत आहे हे आजार होण्यामागे सर्वसामान्य माणसांची बदलती जीवनशैली ,वाढते ताण तणाव ,पोषक आहाराची कमतरता आणि पुरेशा व्यायामाचा अभाव हे कारणे प्राधान्याने दिसून येतात.
सदर कार्यक्रमांमध्ये डॉ कु रजनी गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कामाचा ताण कमी करून आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि शरीर क्रियाशील राहण्यासाठी प्रयत्नही केला पाहिजे. प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीनिधी स्वयंसहायता विकास संघाचे श्री.शांताराम शिंदे यांनी महाआरोग्य शिबिर घेण्या पाठीमागची भूमिका स्पष्ट केली . सदर आरोग्य शिबिराचा शंभरहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला यामध्ये रक्तदाब,मधुमेह व हिमोग्लोबिन इत्यादी बाबींची निशुल्क तपासणी करून अहवाल देण्यात आला.
सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यामध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व त्यांचे कर्मचारी तसेच महादेव मित्र मंडळ सोलापूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे आभार श्रीकांत शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मध्ये प्रा. डॉ. दीपक नारायणकर, श्रीकांत शिंदे, मनोहर नारायणकर ,रोहित होटकर, रवींद्र शिंदे,किरण सदाफुले,जीवन इंगळे,शशिकांत सदाफुले, मनोज शिंदे,विद्याधर सोनकवडे,नागेश खरटमल,संतोष कटके,अरविंद शिंदे ,आनंद व्हटकर , प्रकाश नारायणकर ,विजय कटकधोंड, अनिकेत नारायणकर व प्रशांत नारायणकरयांनी परिश्रम घेतले.