Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH 13 News Network

मातोश्री स्व.सावंत्रव्वा कलशेट्टी यांचे स्मरणार्थ वळसंग येथे पुरस्कार वितरण

सोलापूर – शेतकऱ्यांनी सातबारा वाचायला शिकावे, प्रतिज्ञापत्र हा नागरिकांचा आवडता शब्द असल्याचे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वळसंग येथे केले. वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी व सेवानिवृत्त जिल्हाधिकारी,यशदा पुणेचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मातोश्री स्व.सावंत्रव्वा कलशेट्टी यांच्या 12 व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . याप्रसंगी साखर आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे,यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले .


या प्रंसगी बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, डाॅक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांचे पाणी व स्वच्छता क्षेत्रातील योगदान मोठे आहे. महाराष्ट्र त्यांचे योगदान विसरणार नाही. ज्या आईंने त्याना कष्टाने शिकवले त्या आईचे ऋणातून उतराई होणे साठी सामाजिक व शेती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा त्यांनी गौरव सुरू केला आहे. चांगले काम करणारे व्यक्तींना प्रेरणा मिळत आहे. असेही आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

यंदाचा आदर्श माता पुरस्कार हालचिंचोळी येथील उर्मिला राजकुमार बनसोडे,वळसंग येथील बिस्मिल्ला सत्तार बागवान व कमळाबाई भिमाशंकर चौगुले यांना देण्यात आला.अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांना कर्तुत्ववान, सुसंस्कृत बनविण्यात मोलाचा वाटा वरील मातांनी उचलला आहे.
आदर्श शेतकरी पुरस्कार तीर्थ येथील संतोष वळसंगे,कर्जाळ येथील शाहू गायकवाड व आचेगाव येथील व्हनप्पा कुंभार यांना देण्यात आला..प्रयोगशील शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग निर्माण करून या शेतकऱ्यांनी खरोखरच आदर्श निर्माण केला आहे.येथील महावितरण कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळवून देणारे व पाणी पुरवठ्यासाठी 24 तास थ्री फेज वीजपुरवठा उपलब्ध करण्यात सिंहांचा वाटा उचलणारे सहाय्यक अभियंता प्रमोद आठवले यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाले.शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला नावारूपाला आणणारे, सलग 25 वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावणारे, वयाच्या 82व्या वर्षात ही सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग होणा-या सेवानिवृत्त मुख्याध्यापक संगमेश्वर बागलकोटी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील स्वामी समर्थ विश्राम धाम येथे हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, गट विकास अधिकारी सचिन खुडे, अभय दिवाणजी, चंद्रकांत इंगळे यांच्यासह वळसंग आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी होण्यासाठी स्वामी समर्थ सेवा मंडळाचे पदाधिकारी व हुतात्मा जलसंवर्धन समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *