Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

पिंपरीच्या रावेत भागात काल होर्डिंग कोसून पाच जणांचा मृत्यू झाला तसाच पाऊस आल्यामुळे काही लोकांनी या दुकानाचा आडोसा घेतला होता.पण सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळला आणि पाच जणांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले

होर्डिंग बेकायदा असल्याचे समोर आले आहे ज्याच्या खाली आश्रय घेतला त्याने त्यांचा जीव घेतला

पिंपरी चिंचवड मध्ये अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला  तीथे एक सर्विस रोड आहे त्याला लागुन खाली एक पंक्चर च दुकान होतं या दुकानांमध्ये काही प्रवासी या पावसापासून सुटका करण्यासाठी थांबले होते आणि ज्या गॅरेज वर होर्डिंग   त्याखाली काही जणांनी  छोट्या गॅरेजमध्ये आसरा घेतला वादळी वाऱ्याने त्या गॅरेजवर असलेला  लोखंडी फलक कोसळला.गॅरेज चा पूर्णपणे चुराडा झाला  ते होर्डिंग हटवण्यासाठी चार  चार क्रेन चा वापर करावा  लागला.  हे महाकाय होर्डिंग अनधिकृत होतं.आकार 40 बाय 20 फूट होता मार्च 2021 मध्ये अनधिकृत होर्डिंग ला नोटीस देण्यात आली पाडण्याची नोटीस देण्यात आली होती.उच्च न्यायालयाने होर्डिंग वरच्या कारवाईला स्थगिती दिली. दुर्घटनेनंतर पोलिसांनी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला फलक बनवणारे दत्ता तरच फलक भाड्याने घेणारे महेश काळे आणि त्यावर जाहिरात करणाऱ्या कंपनीचे संबंधित कर्मचाऱ्यांचा ही समावेश आहे.   जर कोर्टाच्या आदेशानुसार एप्रिल 2022 ला असे होर्डिंग हटवलं असतं तर पाच निष्पांचे प्राण गेले नसते. असे सगळे फलक जमीन दोस्त करावेत अशी मागणी नागरिकांनी  केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *