आनंदाची वार्ता | सोलापुरात दिसले फ्लेमिंगो पक्षी; पर्यावरण प्रेमी सुखावले

Big9news Network

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्याला फ्लेमिंगो पक्षीचे आगमन झाले. त्याचप्रमाणे पक्षीप्रेमी यांना माहिती कळाली व ते रविवारी सकाळी लवकर निघाले. काही वेळेत ते तिथे पोहोचले. सुरुवातीला हे पक्षी खूप लांब असल्याने त्यांनी थोडा वेळ थांबले. खूप वेळ झाला पण ते काही जवळ येत नव्हते.

त्यामुळे आज यांचे लांबुनच दर्शन होणार की काय? मग जाऊदे म्हणून ते बाकीच्या पक्ष्याचे फोटो काढू लागले. तितक्यात फ्लामिंगो पक्ष्याचा थवा उडत त्याच्या समोरचं येऊन बसले. त्यामुळे पक्षी प्रेम खूप आनंदी झाले.

लांब, उंच, गुलाबी चोच आणि पंखाचे “रोहित/अग्निपंख” समोर पाण्यात मस्त पैकी चालत वेगवेगळ्या पध्दतीने आम्हाला स्वतःकडे आकर्षित करत होते. आणि आम्ही ही आकर्षित होत होतो. खूपच सुंदर छायाचित्रे मिळाली.” – सुरज धाकपाडे (Wildlife Photographer)