Big9 News
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 7 मे रोजी सोलापूर जिल्ह्यावर होते, पक्षातून निवृत्तीची घोषणा आणि पुन्हा पक्षाचा अध्यक्ष झाल्याने शरद पवार यांच्या या सोलापूरच्या दौऱ्यास विशेष महत्व प्राप्त झाले होते, दरम्यान पंढरपूर सांगोला आदी ठिकाणी आपले कार्यक्रम संपवून रात्री साडे आठ वाजता शरद पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन झाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्यासोबत शेकडो। कार्यकर्ते पवार साहेब यांच्या वाट पाहत होते, परंतु रात्री सव्वा आठच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली, तरी देखील पवार साहेबांची एक छबी पाहण्यासाठी कार्यकर्ते भर पावसात भिजत शरद पवार यांची वाट पाहत होते, साड्डे आठच्या सुमारास शरद पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले, त्यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी पाहून साहेब देखील भारावून गेले आणि ते आपल्या गाडीबाहेर येऊन स्वागताचा स्वीकार केला,
पाऊस सुरू असताना देखील गाडीबाहेर शरद पवार यांनी सर्व कार्यकर्त्या कडून शुभेच्छाचा स्वीकार केल्याने अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले, दरम्यान शरद पवार यांचा हा दौरा सोलापुरातील युवकांसाठी बूस्टर डोस देणारा ठरला,
यावेळी मुसा अतार, गफूर शेख, राजू कुरेशी, ज्योतिबा गुंड, महेश निकंबे, आनंद मुस्तारे, सागर भोसले, महेश कुलकर्णी, ऋषिकेश शिंदे, सरफराज शेख, गणेश छत्रबंद, अक्षय जाधव, नजीब शेख, रियाज शेख, विकास शिंदे, संपन्न दिवाकर, आशिष बसवंती, सचिन खंडागळे, श्रावण ढवळगी, शशिकला कसपटे, आफ़्रिन पटेल, यांच्यसह कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते
Leave a Reply