MH13 News Network
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात 85 ठिकाणी गदापूजन !
हिंदूंमध्ये शौर्य जागरण करण्यासाठी गदापूजन आवश्यक ! -रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर – हिंदूंचा इतिहास हा शौर्यचा आणि पराक्रमाचाआहे;मात्रकित्येक वर्ष सशस्र लढा देऊनमिळवलेल्या स्वातंत्र्यानंतर‘दे दी हमे आजादी बिना खड्गबिना ढाल…’अशाप्रकारे खोटा संदेश देऊनहिंदूंच्या भावी पिढ्यांना शौर्यापासून वंचित केले जात आहे. गेल्या 75 वर्षांत हिंदूंचे शौर्य जागृत होईल,असे कार्यक्रम होतांना दिसत नाहीत. यादृष्टीनेच हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे आणि प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र-स्थापनेला बळ मिळावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्यानिमित्ताने हिंदु जनजागृतीसमिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने सोलापूर शहरासह जिल्ह्यात 85 ठीकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले.
यावेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्रीहनुमानाची आरती, स्तोत्र आणि ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा’ करण्यात आली.
हिंदूंच्या प्रत्येक देवतेचे रुप पाहिले असता, देवतेचा केवळ एक हात आशीर्वाद देणारा, तरअन्य सर्व हातांमध्ये विविध प्रकारची अस्त्रे-शस्त्रे आहेत. त्यादृष्टीने देवतांच्या शस्त्रांचे पूजन केल्यास हिंदूंमध्ये शौर्य जागृत होण्यास साहाय्य होईल. यावर्षी श्रीरामनवमीच्या मिरावणुकांवरती अनेक राज्यांत भीषण आक्रमणे झाली. हिंदूंना लक्ष्य करून हिंदूंचे खच्चीकरण करण्यात आले आहे. या गदापूजनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदूंना बळ मिळावे. हिंदूंमधील शौर्य हे धगधगत राहावे, यासाठी सण-उत्सवाच्यावेळी प्रतिकात्मक शस्त्रपूजन झाले पाहिजे, अशी या कार्यक्रमामागील भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडली. याकार्यक्रमांना संतांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.
आपला नम्र,
राजन बुणगे,
हिंदु जनजागृती समिती, सोलापूर,