Big9 News
नात्याची ओढ आजही सोलापूरकडे खेचते : मंगेश कुलकर्णी
सोलापूर झी स्टुडिओज् आणि आटपाट निर्मिती नागराज मंजुळे प्रस्तुत ‘घर बंदूक बिरयानी’ (आशेच्या भांगेची नशा भारी) हा मराठी चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदशित होत आहे.मंगळवारी पुण्यातील सिटी प्राईड मल्टिफ्लेक्समध्ये मोठ्या जल्लोषात साँग लाँचिंग करण्यात आले.‘गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘घर बंदूक बिरयानी’तील आणखी एक गाणं झळकले आहे.नुकताच ‘घर बंदूक बिरयानी’चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला.यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे,नागराज पोपटराव मंजुळे,सयाजी शिंदे आकाश ठोसर,सायली पाटील,संगीतकार ए.व्ही.प्रफुल्लचंद्र,गीतकार वैभव देशमुख,झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘आहा हेरो’ या गाण्याच्या प्रदर्शनासोबतच ‘घर बंदूक बिरयानी’चे मेकिंगही या वेळी दाखवण्यात आले.या म्युझिक लाँच सोहळ्यात ‘आहा हेरो’ या गाण्यावर गाण्यातील कलाकार,ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी ठेका धरला.या सोहळ्याला मुंबई-पुण्याबरोबरच राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले माध्यम प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.’आ हा हेरो’ साँग लाँचचा सोहळा पार पडल्यावर कलाकारांनी चित्रपटासंदर्भात आलेले काही अविस्मरणीय प्रसंग माध्यम प्रतिनिधींशी कथन केले.कलाकारांनी मनसोक्त गप्पा मारल्या,मात्र चित्रपटाचा मुख्य विषय चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षकांपुढे येईल.’घर बंदूक बिरयानी’ वर मराठी सिनेरसिक भरभरून प्रेम करतील,असा विश्वास अनेकांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी ‘आ हा हेरो’ गीत प्रदर्शित करण्यात आले,त्यात सुप्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांचा वेगळा ‘लूक’ सिनेरसिकांना पहायला मिळेल,हे साँग लाँचमध्ये दिसून आले.सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्याबरोबर क्रिएटिव्ह दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी साकारलेली भूमिका धमाकेदार असल्याचे ट्रिझरमधून दिसते.या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत जंगल आवताडे यांनी केले असून संगीत ए व्ही प्रफुल्लचंद्र म्युझिकल यांचं आहे.ए व्ही नीं त्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे क्षणाक्षणाला जाणवते
‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल साँग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे.गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले हे जबरदस्त गाणे सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.
निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात,आहा हेरो हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे.ए.व्ही.प्रफुल्लचंद्रचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे.त्यामुळे ही गाणी संगीतप्रेमींना नक्कीच आवडणार,हा विश्वास मला पहिल्या दिवसापासून आहे.या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ए.व्ही प्रफुल्लचंद्र म्युझिकल,असे का लिहिले आहे,हे प्रेक्षकांना ७ एप्रिलनंतर कळणार आहे.
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणतात,बिरयानीमध्ये सगळे जिन्नस असतात आणि त्याची प्रत्येकाची एक खासियत असते,जी बिरयानीला अधिक चविष्ट बनवतात.तशीच या चित्रपटात विविध प्रकारची गाणी आहेत,जी संगीतप्रेनींना नक्कीच आवडतील आणि मुळात नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी ही खासच असतात.तशीच ‘घर बंदूक बिरयानी’तीलही आहेत.
- नात्याची ओढ आजही सोलापूरकडे खेचते : मंगेश कुलकर्णी
या सोहळ्यात झी स्टुडिओज् चे प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी,त्यांचं माध्यमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल,महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात झाल्याचं सांगताना,नात्याची ओढ आजही सोलापूरकडे खेचते,अशा शब्दात त्यांचं सोलापूरशी असलेली नाळ प्रारंभी मांडली.त्यानंतर नागराज मंजुळे,हेमंत आवताडे,संगीतकार ए.व्ही प्रफुलचंद्र आणि झी स्टुडिओज् यांची ‘घर बंदुक बिरयानी’ लॉकडाऊनच्या पूर्वीपासून सुरु होती.ती आता पूर्णत्वास आली असून, ओटीटी प्लॅटफॉमबरोबर ७ एप्रिल रोजी राज्यातील ३५० हून अधिक चित्रपटगृहात रसिकाच्या भेटीला येत असल्याचे सांगितले आहे.