ग्लोबल टीचर | डिसले गुरुजी यांचा अमेरिका दौऱ्याचा मार्ग मोकळा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Big9news Network

डिसले गुरुजी यांचा अमेरिका दौऱ्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शिक्षण क्षेत्रात सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवणारे रणजितसिंह डिसले यांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे होते. या संदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केलेला होता परंतु ,जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांच्यावर ताशेरे ओढत नियमांवर बोट ठेवले. त्यामुळे नाराज झालेल्या डिसले गुरुजींनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.

आज शनिवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणी झालेली आहे. डिसले गुरुजी यांना परदेशवारी जाण्यासाठी सर्व परवानग्या देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले असल्याचे सांगितले. डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन वर्ष अनुपस्थित राहिल्याचे शिक्षण अधिकारी लोहार यांनी सांगितले होते.त्याची ही माहिती घेतली जाईल असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

काल संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि विशेषता सोलापूर जिल्ह्यात याच प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होती. नियम, लालफीत, कागदपत्रांच्या घोळात एका शिक्षकाला अडकवले जात आहे त्याच सोबत अहंकार मिरवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचीही चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगत होती.