Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठानतर्फे शिवगौरव पुरस्काराचे  थाटात वितरण

श्री शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठानतर्फे श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवगौरव पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. शिवसह्याद्री कडेकपारी भटकंती समूहास शिवस्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्याभिषेक सोहळ्याचे आणि शिवगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमकमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. यानंतर मोठ्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर, शिवसेना शहर उत्तर समन्वयक महेश धाराशिवकर, सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक विनोद भोसले, श्रीकांत घाडगे, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड, लहू गायकवाड, शिवसेनेचे उपशहरप्रमुख रेवण पुराणिक, निरंजन बोद्धुल, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद कोलारकर,सतीश आतकरे ,कुणाल भोसले, सागर गायकवाड सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठानचे उत्सव अध्यक्ष आतिष बंगाळ, संस्थापक अध्यक्ष व संयोजक बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

आजवर महाराष्ट्रातील तब्बल ५९ किल्ल्यांना भेटी देऊन त्या किल्ल्याचा अभ्यास करणे, संबंधित किल्ल्याची संपूर्ण माहितीचा अहवाल तयार करणे, गडकोटांची स्वच्छता करणे, विद्यार्थ्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांवरील ऐतिहासिक चित्रपट दाखवणे असे उपक्रम राबवणाऱ्या शिवसह्याद्री कडेकपारी भटकंती समूहास यंदाचा शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार समूहाचे डॉ. अभिजीत ननवरे, ., श्री संजीव चाफाकरंडे , श्री विजय माळवे , श्री अमोल साखरे व श्री चंद्रकांत लांबकाने इ .यांनी स्वीकारला. सन्मानचिन्ह, फेटा, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

सोमनाथ सोनकांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन केले. तर संयोजक बाळासाहेब गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे प्रमुख अमृत हावळे,अवधूत पवार,हर्षद कुलकर्णी, राहुल डांगे,सैरभ पवार,सारंग नाईकवाडे,मनोज पाटील, आतिष बंगाळ, पार्थ गायकवाड, प्रणव देशपांडे,अनमोल केकडे,उमेश जंबगी हे सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *