Big9 News
एक मे महाराष्ट्र दिन तसेच परमपूज्य मोरे दादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ अवंती नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पन्नास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
श्री स्वामी समर्थांची पूजा आरती व नामगजराने शिबिरास सुरुवात केली.
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. .श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय यांच्यातर्फे त्या प्रत्येक रक्तदात्याचे आभार मानले. त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या शिबिरात गणेश शितोळे, बाळासाहेब डाके,सोमनाथ आदमने रोहित बिराजदार, प्रभाकर खरात, वेणूगोपाल रेवडी,भूमेश यनगंदूल, अजय ताटे,स्वामी तौर, तात्या काळे. आदी उपस्थित होते.
Leave a Reply