बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर

पुणे /प्रतिनिधी

 

घरी एकटी असताना महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी एका युवकास पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Adv.Lakhan Gaikwad

सुनील अर्जुन दोडमनी असे जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या वतीने ॲड. लखन सुभाष गायकवाड यांनी जामिनीचा अर्ज दाखल केला होता.ॲड. गायकवाड यांनी सदर संशयित आरोपीने असा कोणताही गुन्हा केला नाही तर त्याला संशयावरून खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. स्वतः आणि माहिती देणारा यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता त्यामुळे अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्यात आले आहे. संशयित आरोपीच्या ताब्यातून कोणतीही पुनर्प्राप्ती किंवा शोध नाही असा युक्तिवाद केला.

सदर युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोडमनी याचा जामीन अर्ज मंजूर केला.

ॲड. उमेश मांजरे,ॲड. समीर भरेकर यांनी सदर प्रकरणी काम पाहिले.