Big9 News
सोलापूर – भारतीय संविधानाच्या चौकटीत सर्व जातीधर्माच्या मानवाला समान संधी आणि समान हक्क अधिकार स्वाधीन करून हम सब एक है हे तत्व अवलंबिले. त्यामुळेच आज रमजान महिनाचे रोजे असूनही मुस्लिम मावळे मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत असे मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, श्रीकांत डांगे, संतोष पवार, राम गायकवाड, श्रीकांत जाधव, राजन जाधव, भाऊ रोडगे, यादव सर, मौलिक पवार, तात्यासाहेब वाघमोडे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, पोपट भोसले छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे उपाध्यक्ष राजू हुंडेकरी, कादर भागानगरी, अफरोज तांबोळी, तन्वीर गुलजार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply