Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

पापय्या तालीम संघात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्ती, मंगलमय व उत्साहात साजरा.
सोलापूर दि. 6.4.23 रोजी जुनी मिल कंपाउंड येथील ऐतिहासिक पापय्या तालीम येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त श्री. हनुमान मूर्तीचे विधीवत पूजा तालमीचे नूतन वस्ताद गणेश कुलकर्णी यांचे हस्ते भक्ती, मंगलमय व उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी यावेळी संस्थेचे सभासद व्यायामपटू परिसरातील भाविक भक्तांनी गुलाल व फुलांची उधळण केली. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. गणेश पवार, दयानंद विधी महाविद्यालयचे ॲड. अरविंद देडे व तसेच संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, सेक्रेटरी – प्रदीप शिर्के यांचे उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

 

परिसरातील शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून पापय्या तालमीचे नूतन वस्ताद वसंत (गणेश) कुलकर्णी यांचा उप महाराष्ट्र केसरी श्री. भरत मेकाले यांच्या हस्ते फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व तसेच अँड‌. नूतन जिल्हासत्र न्यायाधीश निवडीबाबत त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री.जगन्नाथ व्यवहारे यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बहुसंख्य कुस्ती व व्यायाम प्रेमी हजर होते. तसेच हनुमान जन्मोत्सव सोहळा दिवशी मा‌. नगरसेवक देवेंद्र कोठे, मा. विनायक कोंड्याल, परिवहन समितीचे अध्यक्ष राजन जाधव, युवानेते नागेश खरात, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, क्रिकेटपटू के.टी. पवार, अँड. विक्रमसिंह काटुळे, अँड. प्रविण निकम, अँड. संघरक्षित – उडाणशिव, अँड. विनायक वड्डेपल्ली इ. मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रकाश सुरवसे, गजानन लामकाने, शिवाजी चटके, किरण बायस, विजय पाटील, जयंत मोरे, पांडुरंग पवार, प्रकाश कदम, लक्ष्मण डोंगरे, दत्तात्रय पाटील, सूर्यकांत भगत, राजन व्यवहारे, अजित शिंदे, रंजीत खताळ, संभाजी मळगे, श्रीनिवास कोटा, जितेंद्र गुरबानी, राकेश मेट्रे, प्रेम इंगळे, परशुराम कोळी, इंद्रनील पापरकर, प्रवीण सुरवसे, कन्हैया मुक्ता, राजकुमार माचकणूर, अतुल कोथिंबरे, प्रथमेश पडवळकर, शुभम घोरपडे, शुभम इंगोले, ऋषिकेश चव्हाण, जालिंदर काटकर, प्रदीप जाधव, संजय हिरळीकर, बबन शिंगाडे, तुकाराम राऊत, राम भोसले, प्रस्ताविक सूत्रसंचालन व आभार मंगेश लामकाने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *