Big9 News
सोलापूरातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने *हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. अक्कलकोट शहरात नगर परिषद नगरपालिका मराठी शाळा माणिक पेठ येथे आपला दवाखान्याचे जिल्हास्तरीय उद्घाटन अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होते तर प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे हे होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विन करजखेडे, पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव उपस्थित होते.
राज्यातील शहरी भागातील जनसामान्य गोरगरीब झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम आरोग्य सुविधा मिळावा हा एकच ध्यास घेऊन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. आता महाराष्ट्र दिनाच्या औचित साधून हे दवाखाने नागरिकांच्या सेवेत समर्पित होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नागरिक आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्र 15 वा वित्त आयोग अंतर्गत स्थापित केले जाणार आहेत .राज्यात 15 वा वित्त आयोग अंतर्गत मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या टप्प्याटप्प्याने रूपांतर’ हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे’आपला दवाखाना केंद्रामध्ये करण्यात येणार आहे .त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात आठ ही तालुक्यामध्ये सोमवारी 1 मे 2023 महाराष्ट्र दिनापासून मा जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार दवाखाने सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली.
या अनुषंगाने राज्यात तीनशे बेचाळीस हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राचे डिजिटल अनावरण व लोकार्पण राज्याचे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व मा आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत 1 मे 2023 रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अशा आठ ठिकाणी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होणार आहे या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार, किरकोळ जखमावर मलमपट्टी यास रक्त चाचणीची सेवा मोफत उपलब्ध करून देणार दिली जाणार आहे. याशिवाय क्ष किरण (एक्स-रे ) सोनोग्राफी इत्यादी चाचणी करता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात सबंधित वैकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष तज्ञाच्या सेवा देखील उपलब्ध होतील. अशा नगरपालिका/भाड्याच्या इमारतीत हे दवाखाने राहणार आहेत. यात ओपीडी स्वरूपात सेवा देण्यात येणार आहे.
आपला दवाखान्यात’ बाह्य रुग्णसेवा .मोफत औषध उपचार मोफत कार्यशाळा तपासणी, टेली कन्सल्टीशन, गर्भवती माताची तपासणी ,लसीकरणच्या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय मानसिक आरोग्यासाठी समुपदन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषता संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉ सोनिया बागडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्यातील सुरू होणाऱ्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य सेवा च्या लाभ घेण्याचे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी केली आहे.