जिल्हा परिषदेत भीम गीतांचा जागर करून बाबासाहेबांना मानवंदना ..!

Big9 News

बाबासाहेब यांचे विचार प्रशासन राबविते- सिईओ दिलीप स्वामी

सोलापूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे विचाराची खरे अर्थाने अंमलबजावणी जिल्हा परिषदे मध्ये विविध कामांचे माध्यमातून करणेत येत आहे. असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त समाज कल्याण विभागाचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रा. डाॅ. प्रभाकर कोळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच मराठा सेवा संघाच्या वतीने भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.भीम गीतांनी उपस्थितांमध्ये स्फुल्लिंग चेतविले. समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार व मान्यवरांना संविधान पुस्तिका भेट देऊन गौरव करणेत आला.

प्रारंभी जिल्हा परिषदेचे आवारात असलेल्या संविधान स्तंभास सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या नंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी सिईओ दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व मान्यवराचे हस्ते दिपप्रज्वलन करणेत आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, अधिक्षक चंद्रकांत होळकर, विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या पाच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना यावेळी गौरविण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घ्या- डॉ. कोळेकर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी काम केले. घरात गाथा असून चालणार नाही. संविधान फक्त घरात असून चालणार नाही. ते डोक्यात घ्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचा व समजून घ्या असे आवाहन सोलापूर विद्यापीठाचे सामाजिक शास्त्र संकुलातील प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम महाराज , महात्मा ज्योतीराव फुले , छत्रपती शाहु महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड यांचे विचार आत्मसात करा. बाबासाहेब यांनी गौतम बुध्द समजून घेतला. आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेऊयात. चवदार तळे, काळाराम मंदिर प्रवेश या घटनांमुळे समतेची ज्योत लोकांचे मनांत पेटविली. आपण आजही जातीयवाद पाळतो. आंतरजातीय विवाह जो पर्यंत होणार नाही तो पर्यंत जातीयवाद संपणार नाही. असेही प्रा. कोळेकर यांनी सांगितले.
मलेशिया येथे झालेले आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभाग घेतले बद्दल कल्याण श्रावस्ती यांची सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते गौरव करणेत आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा विचार – सिईओ दिलीप स्वामी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खुप प्रेरणादायी आहेत. जे त्यांनी यातना, दुःख सहन केले. शिका व संघटित होणेचा नारा दिला. समाजाचे प्रबोधन केले. मी त्याचे विचाराचा पाईक आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ठाम पण सांगितले. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगून जिल्हा परिषदे मध्ये राबविलेले उपक्रम बाबासाहेब यांचे विचार धारेवर राबविले आहेत.

मराठा सेवा संघाकडून भीमगितांची मेजवाणी ..!

महाराष्ट्र गीतानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर प्रभाव टाकणारू गिते सादर करून सभागृहात थक्क करून सोडले.

आजच्या जयंतीचे प्रमुख आकर्षण असलेले स्वानंद ,टीचर्स् म्यूझिकल ग्रुप प्रस्तुत भीमगीतांचा कार्यक्रम झाला, ह्यावेळस रुपेश क्षीरसागर, किरणकुमारी गायकवाड, महेश कोटीवाले, आण्णा सुरवसे, आशा प्रक्षाळे व एकनाथ कुंभार आधी शिक्षकांनी विविध भीम गीतांमधून आंबेडकरी विचारांचा जागर केला.

. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण श्रावस्ती यांनी मनोगत व्यक्ती करून मराठा सेवा संघाने भिमगिताचा कार्यक्रम आयोजित करून चांगला संदेश समाजाता दिला असल्याचे सांगून डाॅ. बाळासाहेब आंबेडकर यांची जगातील पहिला पुतळा माधवराव बागल यांनी कोल्हापूरात उभारला याची जाणीव करून दिली.

यावेळी समाजकल्याण विभागाच्या वतीने कार्यक्रमामध्ये उपस्थित कर्मचा-यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषण व इतर पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्वांना अल्पोपहाराचे वाटप करुन आभार श्रीम.स्वाती गायकवाड विस्तार अधिकारी यांनी मांडले.कार्यक्रमास समाजकल्याण विभगातील शितल कंदलगावकर,शशिकांत ढेकळे,नागनाथ लोखंडे,श्रीम मोनिका हिरेमठ , श्री काळे व इतर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कास्टाईब संघटनेकडून मानवंदना!

जिल्हा परिषद कष्ट संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कस काय संघटनेच्या कार्यालयामध्ये मानवंदना देण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जीएम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे तसेच विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. मानाचा फेटा बांधून संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण क्षीरसागर यांनी सर्व अधिकारी यांचे स्वागत केले. सुत्रसंचलन कल्याण श्रावस्ती यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणे साठी कास्टाईब संघटनेची टीम ने मोठी मेहनत घेतली.