Big9 News
प्रिसिजनमध्ये महिला दिनानानिमित्त “एका पेक्षा एक” एकपात्री बहुरूपी कर्यक्रमाचे आयोजन
सोलापूर प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनीमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वर्षीच्या महिला दिनानिमित्त वनिता पिंपळखरे दिगदर्शित व सारेगम फेम मृदुला मोघे यांनी सादर केलेला “एका पेक्षा एक” एकपात्री बहुरूपी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षी प्रिसिजन कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी महिला दिनानानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. व्यक्तिमत्व विकास, आरोग्य, टाईम मॅनेजमेंट असा अनेक विषयावर मार्गदर्शन आज पर्यंत झाले आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला वैशाली बनसोडे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी प्रिसिजन समूहातील अनेक उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरवात झाली. मुख्य कार्यक्रमात सारेगम फेम मृदुला मोघे यांनी “एका पेक्षा एक” एकपात्री बहुरूपी सादर केले.लोकप्रिय मराठी गाणी व १३ विविध विनोदी भूमिकांचे त्यांनी भन्नाट सादरीकरण केले. विविध एकपा त्री स्किट त्यांनी सादर केल्या. मुंबई लोकल मधील महिलांचा प्रवास, सासू-सुनांचे संभाषण, ग्रामीण आमदार पत्नीचे स्किट असे विविध प्रकारचे विनोदी एकपात्री स्किट यांनी सादर केले. एकपात्री सादर होताना सर्व महिलांनी त्यानं भरभरून प्रतिसाद दिला.
Pकार्यक्रमाच्या शेवटी प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा यांनी कलाकार मृदुला मोघे यांचा सत्कार केला व त्यानंतर उपस्थित कपंनीतील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुहासिनी शहा बोलताना यावर्षीच्या महिला दिनानिमित्त जागतिक स्थरावर ठरलेल्या थिमबद्दल “डिजिटल युगात लैंगिक समानतेसाठी संशोधन आणि तंत्रज्ञान ” त्यांनी माहिती दिली. भेदभाव मुक्त समाज निर्माण करणे तसेच सध्याचा काळ हा डिजिटल क्रांतीचा आहे. डिजिटल युगात लैंगिक समानता निर्माण करणारे संशोधन यावर भर द्यावा. असे त्यांनी सांगितले.
उपस्थित महिला कर्मचारी यांनी हि मनोगत व्यक्त केले. मराठी हिंदी गाण्यांवर डान्स करून या मनोरंजनात्म कार्यक्रमचा सांगता झाली.
सदर कार्यक्रमास डॉ. सुहासिनी शहा, मृदुला मोघे, प्रिसिजन फाऊंडेशन च्या संचालिका मयूरा शहा, सीमा देशमुख, माधव देशपांडे उपस्थित होते.