(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१३ नोव्हे) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ज्योतिबा मंडपात म्हापसा गोव्यातील कालिका संगीत विद्यालय यांच्यावतीने प्रसन्न साळकर निर्मित अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या माध्यमातून भाविकांना भक्तीचा स्वराविष्कार वटवृक्ष मंदिरात अनुभवता आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सर्व मान्यवर व कलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. या भक्तीगीतांवर आधारित सादर झालेल्या स्वराविष्कारात सप्तसूरांचा रागरंग अनुभवता आला. गायक रामनाथ वेदवाणी यांनी गायलेल्या मन झाले समाधानी या भक्ती गीताने सुरूवात झालेल्या या भक्ती सेवेत भक्तीचा सुगंध दरवळला.
गायक दिपक च्यातीम, संगीता साळकर, अर्चना रायकर, गौरी चोडणकर, राजश्री वेर्णेकर, चोडणकर, यांनी गायलेल्या कुणी हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, सद्गुरु नाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा, माय भवानी तुझे रुप चित्ती राहो, नंदकिशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मना मोहना, तू नाम स्वामींचे येता माझ्या ठाईरे, श्री गुरु पायी ठेवितो विश्वास, या एकापेक्षा एक बहारदार भक्ती गीतांगीतांची मेजवानी दिली. त्यामुळे भाविकांना या भक्ती गीतांच्या माध्यमातून सप्तसूरांचा रागरंग अनुभवता आला. या कार्यक्रमात त्यांना तबल्यावर प्रसन्न साळकर, हार्मोनियमवर आनंद रायकर, ऑक्टोपॅडवर प्रशिल साळकर, आनंद वेरणेकर, निवेदन पिनाक चोडणकर, कोरसवर राजश्री वेर्णेकर, यांनी साथ संगत केली. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, रवि मलवे, सागर गोंडाळ, संतोष जमगे, महादेव तेली, सचिन पेटकर, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, आदींसह स्वामी भक्तांनी उपस्थित राहून या गायन सेवेचा लाभ घेतला.
Leave a Reply