उदगीर : कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदूतानी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम वर्ष २०२४- २५ आवलकोंडा येथे विविध उप्रकमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा केला जात आहे. हा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगक संलग्नता उपक्रम संबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आवलकोंडा गावामध्ये जाऊन कृषिदूतांनी शेतीशी संबंधित ॲपची माहिती शेतकऱ्यांना दिली.
सर्वप्रथम Agrovan, E- Pic Pahani, Agro star, Plantix इत्यादीची माहिती शेतकऱ्यांना दिली व प्रत्यक्षरीत्या शेतात जाऊन शेतकर्याना Plantix APP व Agro Star चा वापर करून दाखवला. यावेळी सहभागी विद्यार्थी शेख अल्ताफ, शेख मतीन, शेंडगे आदर्श, शिंदे दिव्यरतन, शिंदे ज्ञानेश्वर, शिंदे कुशाल, सोनकांबळे आदर्श व गावातील शेतकरी उपस्थित होते या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य ए.पी. सुर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.ए.एम पाटील, कार्यक्रम समन्वय डॉ. एस.एन वानोळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन खंडागळे , विशेष विषयतज्ञ डॉ. के. पी. जाधव व प्रो. बी.बी. निमनवाड व प्रो .प्रफुल सोळंके यांचे विशेस मार्गदर्शन लाभले.