सोलापुरात ‘महाबैठक’ | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ‘ॲक्शन मोड’मध्ये..

Big9 News

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवारी सोलापूर दौरा

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी (दि.१२) सोलापूर दौऱ्यावर आहेत. शहर जिल्हा भाजपतर्फे आयोजित महाबैठकीस प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे संबोधित करणार आहेत.

सायंकाळी ५ वाजता हेरिटेज मंगल कार्यालयात शहर जिल्हा भाजपची महाबैठक होणार आहे. यावेळी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. रणजीतसिंह मोहिते – पाटील, माजी आ. प्रशांत परिचारक, आ. राजेंद्र राऊत, आ. राम सातपुते, आ. समाधान आवताडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

भाजपाच्या महाबैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. भाजप सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवून जनतेच्या मागण्या पक्षामार्फत सरकारपर्यंत पोहचविण्याचे कार्य आणखी गतीने करण्याबाबत यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सूचना करणार आहेत.

याशिवाय शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बलिदान चौक येथे युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन होणार आहे. तर सकाळी ११.४५ वाजता शिवस्मारक सभागृहात सामाजिक एकत्रीकरण बैठकीस उपस्थित राहून प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दुपारी १२.४५ वाजता विजयपूर रस्त्यावरील इंदिरा सभागृह येथील आदर्श बूथला ते भेट देणार आहेत. यानंतर दुपारी १.४५ वाजता व्यापारी उद्योजकांसह आयएमए हॉल येथे भोजन घेणार आहेत. तर दुपारी ४.३० वाजता हेरिटेज लॉन येथे सोशल मीडिया बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या महाबैठकीनंतर सायंकाळी ७.३० वाजता शहर व ग्रामीण कोअर कमिटीची बैठक हेरिटेज लॉन येथे होईल. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी आणि शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केले आहे.