Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

घर जागा विकत घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी फिर्यादी नेहा सय्यद त्यांचे पती नियामत अली सय्यद यांच्यावर छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तिने फिर्याद दिली.चौघावर गुन्हा दाखल झाला आहे. नेहा सध्या तिच्या माहेरी सरवदे नगर हैदराबाद नाका येथे राहत आहे. यांचा विवाह 2018 मधे झाला असून,

पती नियमत आली सय्यद राहणार लातूर, लग्न झाल्यापासून पैशांसाठी नेहाचा मानसिक छळ करायचा तिला शिवीगाळ करून, माहेराहून पैसे आणवयास सांगत. नेहा त्याच्या छळाला कंटाळून गेली होती. सासरच्या माणसानी संगणमत करून रोज  तिला तगादा लावून तिचा छळ करीत.माहेराहून जागा घेण्यास पैसे घेऊन ये,त्यानंतरच नांदायला ये.
असे म्हणत, तिला त्रास दिला.

शिवाय आरोपीने तिच्या चरित्र्यावर संशय घेत. शिवीगाळ करून तिच्यावर मारहाण केली. अशी फिर्याद सय्यद यांनी दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नियामत अली सय्यद, सासरे अकबराली सय्यद, मुमताज अली सय्यद, दिर सिपटन अकबर सय्यद अली सय्यद (रा.लातूर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *